लोणावळ्यातील कार्ला येथे बाप- लेकाच्या जोडीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहूब पुतळा साकारला आहे. कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये पुतळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. मनोज जरांगे यांचं मराठा समाजासाठी मोठं योगदान आहे. त्यांचं हे योगदान पुढील पिढीला कळावं म्हणून कार्ला येथील पुतळा आर्टिस्ट ऋषीकेश म्हाळसकर आणि अशोक म्हाळसकर पिता-पुत्राच्या जोडीने जरांगे यांचा पुतळा साकारला आहे.