शिवसेनेचं (ठाकरे गट) अधिवेशन मंगळवारी नाशिकमध्ये पार पडलं. यावेळी भाषणातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर कडाडून टीका केली. शिवसेनेतील नेत्यांवर तपास यंत्रणांकडून केली जाणारी कारवाई, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौऱ्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे.