मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खराडीत पोहोचली. खराडीतून जरांगे पाटील सकाळी लोणावळ्याकडे मार्गस्थ झाले आहेत. पदयात्रेत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. पुण्यातील शिवाजीनगरसारख्या मध्यवर्ती भागातून जरांगे आपला मोर्चा घेऊन पुढे जात असता त्यांनी लोकसत्ताशी संवाद साधला.