२६ जानेवारी (26 January) हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन (75th Republic Day) साजरा करत आहोत. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले.