गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं होतं. मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी थेट मुंबईकडे कूच केली होती. अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने सुधारित अध्यादेश जारी करून मनोज जरांगेच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषणही मागे घेतलं.