मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यांनतर विजयी सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण दिलेला शब्द पाळला असं म्हणत जाहीर सभेत घेतलेली छत्रपती शिवरायांची शपथ पूर्ण केल्याची आठवण करून दिली.