मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर एकच जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र यावरून आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान, वाशीत शुक्रवारी रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत सुधारित अध्यादेश जारी केला होता.