ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांच्या कटुंबांतील सग्यासोयऱ्यांना प्रमामपत्र दिलं जावं. त्याचा अध्यादेश दिला जावा, अशी मनोज जरांगेंची मागणी होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. मात्र, सगेसोयरे या शब्दाची व्याख्या स्पष्ट होणं गजरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केलं आहे.