राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आपल्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याची भावना ओबीसींकडून व्यक्त केली जात असल्याचं भुजबळ यावेळी म्हणालेत. दरम्यान, मनोज जरागें यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मुंबईतील आंदोलन टळलं.