बिहारमध्ये अभूतपूर्व राजकीय उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राजद-काँग्रेससह असलेल्या आघाडीतून बाहेर पडत सरकार पाडले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी एनडीएसह सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांनी स्वीकारलं असून नितीश कुमारांनी काल २८ जानेवारी रोजी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.