ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज (२९ जानेवारी) ईडी चौकशी आहे, त्यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. “अजित पवार यांचा ७० हजार घोटाळा, दादा भुसे, राहुल कुल यांना ईडीच्या कारवाई का नाही? नोटीस का नाही पाठवली? त्यांना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.