महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापला होता. अखेर २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला. राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या विविधं मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. यावर स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीये.