पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २२ जानेवारीला अयोध्येतील बहुचर्चित रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडण्याआधी पंतप्रधांनानी आपण ११ दिवसांचे धार्मिक अनुष्ठान स्वीकारणार असल्याचे सांगितले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलीये. “अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर हे भाजपाने उभारलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंदिर समितीने हे मंदिर उभारले आहे. परंतु पंतप्रधान मोदी मात्र उपवासाचे नाटक करून देशाची दिशाभूल करत आहेत. नरेंद्र मोदी हे आयुष्यभर सतरंजीवर झोपणार आहेत काय?” असा सवाल राऊतांनी केला.