योग गुरू रामदेव बाबा यांचा मेणापासून तयार केलेल्या पुतळ्याचं आज दिल्लीत अनावरण करण्यात आलं आहे. न्यूयॅार्कच्या प्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात हा पुतळा ठेवला जाणार आहे. तत्पूर्वी रामदेवा बाबांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दरम्यान, हुबेहूब साकारलेल्या या पुतळ्याने यावेळी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.