नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला धक्का देत पुन्हा भाजपाशी हातमिळवणी केली आणि एनडीएमध्ये सहभागी झाले. त्यानंतर नवव्यांदा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या या धक्कातंत्रानंतर आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांनी देखील यावर आता भाष्य करत नितीश कुमार यांना खोचक टोला लगावला आहे.