मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सध्या मराठा आरक्षणासाठीच आंदोलन उभं राहिलं आहे. अंतरवाली सराटीत कित्येक दिवस उपोषण करून त्यांनी सरकारला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर मुंबईच्या वेशीवर येऊन मराठा आंदोलनाची धग त्यांनी दाखवून दिली. या संघर्षाविषयी जरागेंनी भाष्य केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.