देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी, “लखपती दीदींना प्रोत्साहन दिला जाणार असून, लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे”,असा दावा केला.