देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावेळी त्यांनी ३ नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधले जातील, अशी घोषणा केली. हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. यामुळे पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारेल आणि गाड्यांमधील प्रवास सुरक्षित होईल, असंही सीतारमण म्हणाल्या.