देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. संशोधनावर १ लाख कोटींचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअप्सला मिळणाऱ्या करसूटीचा विस्तार करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवतानाच भांडवली खर्चाला ११ लाख ११ हजार १११ कोटींपर्यंतच्या ऐतिहासिक उंचीवर नेऊन ठेवण्यात आलं आहे”