शिवसेनेच्या (ठाकरे गट) ‘जनसंवाद’निमित्त उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. त्याची सुरुवात आज पेणमध्ये झाली. आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांचा विकास, शेतकरी, गरीब कल्याण, रोजगार या सगळ्यावर भाष्य करण्यात आलं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.