ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना दर महिन्याला ठराविक पैसे कसे मिळतील असाही प्रश्न असतो. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणं गरजेचं होतं. अर्थसंकल्पात चार स्तंभांचा उल्लेख झाला पण ज्येष्ठ नागरिकांना त्यात स्थान मिळालं नाही. १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात १० ते १५ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना प्राधान्य मिळणं आवश्यक होतं.