महाविकास आघाडीची दुसरी बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. एकीकडे मविआबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तर दुसरीकडे आता इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही, असं महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे.