मागील काही महिन्यापासून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहत आले आहे. काल (२ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत,या नाटकाचा प्रयोग उधळून लावला.