मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांत राज्यभर अनेक आंदोलनं आणि उपोषणं केली. आरक्षणासाठी त्यांनी मुंबईपर्यंत मोर्चाही काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश काढल्यानंतर विजयोत्सव साजरा करत मराठा आंदोलक स्वगृही परतले. परंतु, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते, त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय.