सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत २ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत या नाटकाचा प्रयोग उधळून लावला. याविरोधात अभविपकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. याप्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान काल (३ फेब्रवारी) भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची तोडफोड करित निषेध नोंदविला.