वरळीचे (मुंबई) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी (४ डिसेंबर) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मुंबईतल्या महालक्ष्मी येथील रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना आदित्य ठाकरे यांनी गणपत गायकवाड (भाजपा आमदार) यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणाचा उल्लेख करत राज्यातील अराजकता मांडली.