वरळीचे (मुंबई) आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी (४ डिसेंबर) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मुंबईतल्या महालक्ष्मी येथील रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला धारेवर धरलं. आदित्य ठाकरे म्हणाले, दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता. दुसऱ्या बाजूला कोस्टल रोडचं काम पूर्ण देखील झालेलं नाही. तरी केवळ निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा घाट घातला जातोय.