शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या तीन दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. जनसंवाद दौऱ्यानिमित्त ते कोकणातील पदाधिकारी आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. रविवारी उद्धव ठाकरे यांची कणकवलीत सभा पार पडली. यावेळी त्यांनी राणे पिता पुत्रांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला. तसंच पक्ष फुटीवरूनही शिंदेंना लक्ष्य केलं.