२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता ज्ञानवापी व कृष्ण जन्मभूमी इथल्या मंदिरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर देशभरात मोठी चर्चा चालू असतानाच आता राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “आम्हाला देशातली तीन मंदिरं शांततापूर्ण प्रक्रियेतून मिळाली, तर आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ”, असं गोविंद देव गिरी महाराज म्हणाले आहेत.