झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ८.५ एकर जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाईही करण्यात आली. त्यानंतर झारखंडमध्ये सत्ता बदल झाला. चंपाई सोरेन यांच्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी आज हेमंत सोरेन विधानसभेत हजर होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून भाष्य केलं आहे.