ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (५ फेब्रुवारी) राजापूर येथे सभा पार पडली. यावेळी ठाकरेंनी राजन साळवींच्या घरावरील एसीबी छाप्याच्या प्रकरणावर राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी ठाकरेंनी एसीबी छाप्यासंदर्भातील अधिकाऱ्याचं नाव घेत छाप्याची यादीच वाचली आणि शिंदें सरकारवर हल्लाबोल केला.