उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज (५ फेब्रुवारी) राजापूर तालुक्यातील श्रीदेव धुतपापेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी रश्मी ठाकरे देखील त्यांच्याबरोबर होत्या. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत यासाठी गाऱ्हाणंही घातलं.