उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या भाषणा दरम्यान शरद पवार यांना अनुसरून केलेले विधान सध्या चर्चेत आहे. याच विधानावरून आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. “आम्हाला माहीत असलेले अजित पवार आणि आताचे अजित पवार हे फार वेगळे आहेत. केवळ भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू असून आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून येऊ शकतो “ असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. बीडमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या इमारत लोकार्पणप्रसंगी रोहित पवार बोलत होते.