काल म्हणजेच ५ फेब्रुवारीला राज्यसभेतील वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. त्याचं झालं असं की, राज्यसभेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एक प्रश्न वगळण्यात आला आणि एका काँग्रेस खासदाराने त्यास विरोध केला. यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी आवाज उठवला आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना म्हणाल्या की, “आम्ही शाळकरी मुलं नाही आहोत. आम्हाला आदराची वागणूक मिळाली पाहिजे”