बाजारात सध्या टोमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे. बाजारात लसणाचे दर हे ४०० पार झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलंय. खराब हवामानामुळे लसणाचे पीक खराब झाले आहेत. त्यामुळे आवक ही कमी सुरु आहे. नवी मुंबईतील बाजारामध्ये ४८० रुपये किलोने लसूण विकला जात असल्याने ग्राहकांनीदेखील पाठ फिरवली आहे. मात्र याचा फटका व्यापाऱ्यांना बसतोय. आता, रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचं काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.