पुण्यात आगामी काळात टोळी युद्ध होऊ नये यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील गुंडांना चांगलाच दम भरण्यात आला आहे. जवळपास २६७हून अधिक गुंडाच्या टोळया बोलावून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ याच्यासह अनेक टोळी प्रमुख उपस्थित होते.