राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असतानाच आज (७ फेब्रुवारी) पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पक्ष कार्यालयाबाहेर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध केला.