अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद थांबायचं नाव घेत नाहीयेत. काल (७ फेब्रुवारी) नवी मुंबईतील एका कार्यक्रमात जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय. “मराठे ओबीसीत आले आहेत. मराठे ओबीसीमध्ये आल्याने छगन भुजबळांना अपमान वाटतो. छगन भुजबळांनी चष्माच्या काचा बदलून फिरावे. शेर शायरी मारून भाषण करतात, पण मला हिंदी जमत नाही” असं जरांगे म्हणालेत.