काल (६ फेब्रुवारी) राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. त्याअनुषंगाने काँग्रेसला लक्ष्य केलं. पण आज (७ फेब्रुवारी) राज्यसभेत बोलताना मोदींनी देशाचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे राज्यसभेतील ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्यासाठी गौरवोद्गार काढले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.