मराठा आरक्षणावरून बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा आपली आक्रमक भूमिका मांडली. “आमचं म्हणणं एवढेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. शुक्रे आयोगाच्या माध्यमातून आरक्षण देण्याचे काम कदाचित १५-१६ फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे. यावेळी जे खोटे कुणबी ओबीसीमध्ये घुसवलेले आहेत त्यांना ओबीसीच्या ऐवजी वेगळ्या आरक्षणामध्ये टाका. जरांगे पाटीलमध्ये हिंमत असेल तर मंडल आयोग संपवून दाखवावा” असा इशाराही भुजबळांनी दिलाय.