ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (८ फेब्रुवारी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला फटकारलं. तसंच सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.