ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. दरम्यान, अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सध्या रंगतेय. या सर्व प्रकारच्या चर्चांवर स्वतः अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.