महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी (१२ फेब्रुवारी) काँग्रेसचा राजीनामा दिला. चव्हाण भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दोन दिवसांत आपण आपली भूमिका जाहीर करू असं चव्हाण म्हणाले होते. अखरे आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.