राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात निवडणुक आयोगामार्फत घेण्यात आला होता. त्या निर्णयानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. एकीकडे शरद पवार यांच्या पक्षाला चिन्ह लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे शरद पवार गट लवकरच काँग्रेस पक्षात विलीन होणार अशी चर्चा सुरू झालीये. या सर्व घडामोडींदरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल देशमुख यांच्यासह राज्यातील अन्य नेतेमंडळी सोबत बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.