अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटन मजबूत करण्याची मोठी जबाबदारी पक्षाची आहे. या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळात काँग्रेस आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र आमदारांनीच दांडी मारल्याचं दिसतंय. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.