काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलाय. यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोमणा मारलाय. “उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता तर, तो निकालही त्यांच्याचं बाजूने लागला असता. आधी भ्रष्टाचार करा, मग पक्ष फोडा आणि मग मूळ पक्षावर दावा करा. त्यामुळे अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो की, त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे दावा सांगितला नाही. जर त्यांनी हा दावा सांगितला असता तर त्यांना पक्षाचं चिन्ह मिळालं असतं आणि नाव देखील मिळालं असतं. तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी त्या पक्षावर दावा करू शकता ही मोदींची हीच गॅरंटी आहे”