राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र आधीच खासदारकीची चार वर्ष बाकी असताना राज्यसभेची उमेदवारी पटेलांनाच का दिली असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.