जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करून त्याआधारे तयार करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचे आज (१५ फेब्रुवारी) मुंबईत प्रकाशन होत आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन उपस्थित राहणार आहेत. जिल्हा निर्देशांकमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा यावेळी सन्मान केला जाईल.