जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करून त्याआधारे तयार करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (१५ फेब्रुवारी) मुंबईत पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी उपस्थिती लावली होती. जिल्ह्याचा विकासाचा निर्देशांक, अशा शब्दांत त्यांनी लोकसत्ताच्या उपक्रमाचे कौतुक केले.