माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर चिडलेले माजी खासदार निलेश राणेंनी भास्कर जाधवांना हिशोब चुकता करणार, असा इशारा दिला होता. त्यानुसार राणेंची आज गुहागर येथे जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, सभास्थळी जाणाऱ्या निलेश राणेंच्या गाड्यांचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर आला असता, भास्कर जाधव समर्थक व निलेश राणे समर्थक आमने-सामने आले.